…म्हणून विरोधक महिलांसाठी योजना जाहीर करत आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र आणि राज्य सरकारचं डबल इंजिन महाराष्ट्राचा विकास करत आहे. महाराष्ट्राचा विकास पाहून विरोधकांच्या पोटात दुखलं आणि त्यांनी खटले दाखल केले. परंतु याचा फटका आपल्यालाच बसेल हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर आता हे विरोधक महिलांसाठी योजना जाहीर करत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात वाडेगाव इथं महायुतीच्या प्रचार सभेत  बोलत होते.

 

राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा येईल असा विश्वास शिंदे व्यक्त  करत  सत्तेत आळ्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला दोन हजार १०० रुपये जमा केले जातील, अशी घोषणा केली.