डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 14, 2024 7:22 PM | CM Eknath Shinde

printer

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ

शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठीची मुदत १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असं आवाहन शासनानं केलं आहे.

 

राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत सुरू केलेल्या या उपक्रमात प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक, तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एक, अशा पद्धतीनं एकंदर ५० हजार योजनादूतांची निवड सहा महिन्यांसाठी केली जाणार आहे. त्यांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिलं जाणार असून या उपक्रमासाठी आत्तापर्यंत १ लाख ६६ हजारांहून जास्त उमेदवारांनी नोंदणी केली आहे.