September 1, 2024 3:06 PM | CM Eknath Shinde

printer

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांना पराभव दिसत आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे परिस्थिती बदलली असल्याचा दावा त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचं आंदोलन पूर्णपणे राजकीय असल्याची टीका छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना केली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपानेही आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.