डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 29, 2024 3:46 PM | CM Eknath Shinde

printer

साताऱ्यात पाटण विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध कामांचं भूमीपूजन

साताऱ्यात पाटण विधानसभा मतदारसंघातल्या विविध कामांचं भूमीपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई बहुद्देशिय कृषी संकुलाचं उद्घाटन  आणि  नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या पाणी योजनेचं भूमीपूजन याचा यात समावेश आहे. त्यानंतर नाडे इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. मल्हारपेठ इथं ग्रामसचिवालयाचे नुतनीकरण आणि नामकरण कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. पाटणमधल्या दौलतनगर मरळी इथल्या विविध विकास कामांचं ऑनलाईन भूमीपूजन आणि लोकार्पणही ते करणार आहेत.