मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं लोकार्पण

मुंबई महानगरपालिकेनं नूतनीकरण केलेल्या भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. संग्रहालयाच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन होत असून आपला ऐतिहासिक वारसा भावी पिढीला पाहता यावा हा संग्रहालय उभारणीचा उद्देश आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.