राज्यातल्या  प्रत्येक शहरात चित्रपटगृहांची  संख्या वाढण्याची गरज-मुख्यमंत्री

राज्यातल्या  प्रत्येक शहरात चित्रपटगृहांची  संख्या वाढण्याची गरज आहे. त्यासाठी सध्या असलेल्या एकल पडदा चित्रपटगृहांना काही सवलती देता येतील का, तसंच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच ठिकाणी दाखवता येतील का याबाबत विचार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. नगरविकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या  विविध नियोजन प्राधिकरणांचं सक्षमीकरण करुन त्यांचं कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावं , असंही ते म्हणाले.