प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देऊन शासन त्यांना आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करुन त्या स्वावलंबी बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या किनगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’चा शुभारंभ आज झाला. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यातल्या एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करुन लाभ देण्याबरोबरच प्रत्येक ग्रामस्थाला स्वाभिमानानं जगायला शिकवणारं अभियान आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. लोकसहभाग हा या अभियानाचा गाभा असल्याचं त्यांनी सांगितलं.