राज्यातल्या रामोशी-बेरड-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून राज्य शासनाने कर्ज योजना आणल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली.
ते काल आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या २३४व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातल्या भिवडी इथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पोलीस भरतीसाठी विशेष योजना, तसेच शिक्षण आणि प्रशिक्षणाकरता महाज्योती आणि सारथीमार्फत योजना राबवल्या जातील, असंही फडनवीस यावेळी म्हणाले.