जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात ‘आयएएम’ च्या दोन दिवसीय परिषदेच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते बोलत होते. प्रशासकीय यंत्रणेत बदल होण्याची भावना लक्षात घेऊन एप्रिल महिन्यात राज्य स्तरावरच्या सर्व जिहाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिषद घेऊन सहा समित्यांची स्थापना केली गेली. या समित्यांनी अभ्यासपूर्ण शिफारशी केल्या असल्याचं ते म्हणाले.
Site Admin | August 3, 2025 6:37 PM | CM Devendra Fadnavis | deve | Maharashtra
जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय येण्यासाठी धोरणात्मक बदल करणार – मुख्यमंत्री
