देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेचं म्हणजेच आयआयसीटीचं उद्घाटन काल मुंबईत झालं. केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या आवारात उभारलेल्या या संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं.
युवा पिढीला सक्षम करुन कलात्मक निर्मिती उद्योगात आधुनिकता आणण्याचा सरकारचा दृष्टीकोन आहे असं सांगून या संस्थेमुळे देशातल्या युवा पिढीसाठी संधींची नवी कवाडं खुली होतील असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या संस्थेमुळं कलात्मक निर्मिती क्षेत्राला आवश्यक दिशा आणि संस्थात्मक पाठबळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी वेव्ज भारत दालनाचंही उद्घाटन वैष्णव आणि फडणवीस यांच्या हस्ते झालं. तसंच आयआयसीटीच्या बोधचिन्हाचं आणि वेव्ज परिषदेच्या फलिताची माहिती देणाऱ्या अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं.