जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही पद्धतीने, विरोधी पक्षांच्या सदस्यांचं म्हणणं ऐकून घेऊन तयार केलं गेलं, याबाबतच्या समितीतल्या कुणीही असहमती दर्शवली नाही, मात्र विरोधकांनी नंतर दबाव आल्यामुळे सभागृहात वेगळी भूमिका घेतली, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पावसाळी अधिवेशनानंतर वार्ताहरांशी बोलताना केला.
जनसुरक्षा कायद्यात कसलीही स्पष्टता नसल्यानं त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या कायद्याला विरोध असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, या विधेयकाच्या विरोधात असलेला जनप्रक्षोभ लक्षात घेऊन राज्यपालांनी त्याला मान्यता देऊ नये आणि ते पुनर्विचारासाठी शासनाकडे परत पाठवावं अशी विनंती महाविकास आघाडीच्या आमदारांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना केली.