शेजारी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर कमी असून शेतकऱ्यांना सौर वीज घेण्याची सक्ती नाही मात्र, त्यांच्या सौर ऊर्जेशी संबंधित अडचणी समजून घेऊन त्यावर प्राधान्याने उपाय शोधले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
वीज दरवाढीचा प्रश्न अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केला होता.पूर्वीच्या काळात शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोलर बूस्टर पंप पेक्षा, आता दिले जाणारे पंप अधिक सक्षम आहेत, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सोलर पंपसंबंधी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोर्टल कार्यरत. तरीही एखाद्या ठिकाणी अडचणी कायम असल्या तर तेथील शेतकऱ्यांना, सौर ऊर्जे ऐवजी पारंपरिक वीज देण्याचा विचार करु, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.