December 24, 2024 6:43 PM | CM Devendra Fadnavis

printer

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावरुन काँग्रेसचं राजकारण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती जपण्याचं काम केंद्र सरकार आणि भाजपाने केलं आहे मात्र काँग्रेसने त्यांना कोणताही सन्मान दिलेला नाही. त्यांना निवडणूकीत पराभूत केलं. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावरुन काँग्रेसने राजकारण केलं असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केला. ते नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते.