राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयाच्या नियंत्रणासाठी विशेष तपासणी पथक स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते. धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांवर केलेल्या उपचाराची माहिती, रुग्ण, शिल्लक खाटा यांची माहिती ऑनलाईन भरावी, तसंच रुग्णालयात रुग्णांच्या योजना, आजार, उपचाराबाबतच्या माहितीचे मोठ्या अक्षरातले फलक लावावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.