डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विदर्भाच्या विकासासाठी शासन वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

राज्यातल्या शेतकऱ्यांना वर्ष २०२६ अखेर १२ तास मोफत वीजपुरवठा केला जाईल असं  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. वर्धा जिल्ह्यात आर्वी इथं ७२० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण आज  फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.  

 

राज्यात विजेचे दर ५ वर्षांसाठी  स्थिर करुन राज्यशासनाने वीज ग्राहकांना दिलासा दिल्याचं ते म्हणाले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पाणी आणि वीज पुरवठ्याकरता सरकारने हाती घेतलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. भूजल पातळी खोल जात असल्यामुळे शेतकऱ्यांना १० अश्वशक्तीचे कृषीपंप वापरण्याची परवानगी देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सहभागी होण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं. समृद्धी महामार्गामुळे देशव्यापी दळणवळण व्यवस्थेत विदर्भ केंद्रस्थानी आला असून तिथं औद्योगिक विकास करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे असं ते म्हणाले.