शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून १ मे पर्यंत ही सर्व कामं पूर्ण होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज सांगितलं. २६ विभागांचे सचिव यांच्यासह कृती आराखड्याचा आराखडा घेतल्यानंतर ते बोलत होते. शंभर दिवसांच्या आरखड्यात ९३८ कृतीबिंदूवर काम करायचं निश्चित केलं होतं. त्यानुसार ४११ कामं पूर्ण झाली असून, ३७२ कामं अंतिम टप्प्यात आहेत. तर, केवळ १५५ कामं, अर्थात १६ टक्के मुद्दयांवर, कामं बाकी आहेत. त्यासाठी विभागांना १५ दिवसांचा अवधी वाढवून दिला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उद्या २२ विभागांचा आढाचा घेणार असल्याचं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.