राज्यातील छोट्या गुंतवणूकदारांचे पाच लाखांपर्यंतचे पैसे सुरक्षित रहावे यासाठी फसवणूक करणाऱ्या मल्टिस्टेट पतसंस्थांना देखील सहकारी बँकांप्रमाणे संरक्षण द्यावे अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत दिली.
बीड जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेकडून फसवणूक झालेल्या सहा लाख ठेवीदारांचे पैसे जप्त करण्यात आलेल्या ८० मालमत्तांचा लिलाव करून परत केले जातील. यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा तयार केला आहे, यातून ही कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भातला प्रश्न प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला होता, त्यावर नाना पटोले, बबनराव लोणीकर यांनी उपप्रश्न विचारले.
राज्य पोलीस दलात आर्थिक इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येत आहे, त्यातून अशा प्रकारच्या सर्व पॉन्झी योजनांवर वचक ठेवला जाईल, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.