नवीन खाणपट्टे मंजुरी प्रक्रियेत ‘गती शक्ती’ प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करुन राज्यातले खाणपट्टे कार्यान्वित करण्यासाठी लिलाव प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या प्रमुख खनिजांच्या ४० खाणपट्ट्यांबाबतची बैठक सह्याद्री अतिथीगृहात काल झाली. राज्य खनिकर्म महामंडळ व खनिकर्म विभाग, खनिकर्म विभागांतर्गत हाताळण्यात येणारे विषय, खनिजक्षेत्राची ई-लिलाव प्रक्रिया आदींबाबत सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला.
Site Admin | March 9, 2025 3:24 PM
खाणपट्टे कार्यान्वित करण्यासाठी लिलाव प्रक्रियेला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
