डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 12, 2025 10:27 AM | CM Dashboard

printer

शासनाच्या विभागांची माहिती एकाच संकेतस्थळावर मिळण्यासाठी ‘स्वॅस’ प्रणाली विकसित

शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला एकाच संकेतस्थळावर मिळावी , यासाठी ‘सीएम डॅशबोर्ड’ म्हणजे ‘स्वॅस’ (SWaaS) प्रणाली विकसित करण्यात येत आहे. शासनाच्या धोरणात्मक योजना, त्यांची प्रगती, अद्ययावत माहिती, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, विभागनिहाय माहिती यामध्ये असावी आणि यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज भासू नये, या उद्देशानं ही प्रणाली विकसित करण्यात येत आहे. यामध्ये 34 विभागांच्या संकेतस्थळाच्या सेवांबरोबरच न्यायालय, रेरा तसंच कायदा आणि सुव्यवस्था या सेवांचाही या प्रणालीत समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत बैठकीत दिले.