महाराष्ट्रातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव असलेल्या नागपूर जिल्ह्यातल्या सातनवरी गावाचा यशस्वी प्रयोग बघून या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातली १० गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करायचा निर्णय सरकारनं घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपूरमध्ये केली.
सातनवरी या गावातून स्मार्ट आणि इंटेलिजंट व्हिलेज योजनेचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेअंतर्गत कृषी, आरोग्य, शिक्षण अशा १८ वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे संपूर्ण सातनवरी गावाचं परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.