डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

क्लायमेट स्कील उपक्रमासाठी मुंबई विद्यापीठाची निवड

ब्रिटीश कौन्सिलच्या क्लायमेट स्कील उपक्रमासाठी मुंबई विद्यापीठाची निवड झाली आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली आणि शाश्वत विकास ही या कार्यक्रमाची उद्दीष्टं असून देशभरातल्या तीन उच्च शिक्षण संस्थांची निवड केली आहे.

 

या उपक्रमातून युवकांना हवामान बदलांविषयी जागरुक करुन संबधीत समस्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचं प्रशिक्षण दिलं जाईल. भारतासह ब्राझिल, मेक्सिको, इंडोनेशिया आणि व्हिएनतनाममध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.