खरीप पीक विम्यासाठी ७६ लाख ३६ हजारहून अधिक दावे

राज्यात खरीप पीक विम्यासाठी ७६ लाख ३६ हजारहून अधिक दावे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे दाखल केल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. याचे सर्वेक्षण सुरू असून नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती लवाटे यांनी दिली. दाखल दाव्यांपैकी ७६ लाख २० हजार २४४ दावे ऑनलाईन स्वरुपात तर १६ हजार ६२३ दावे प्रत्यक्ष दाखल झाले आहेत. एकट्या बीड जिल्ह्यातून सर्वाधिक १० लाख ८७ हजार ९४४ दावे दाखल झाले तर नांदेड जिल्ह्यातून ८ लाख ९ हजार २३५ दावे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यात झालेल्या जोरदार पावसाचा फटका उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, भाजीवाला, बाजरी या पिकांना बसला आहे. अशी माहिती आवटे यांनी दिली.