देशाचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती सूर्यकांत शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील. पुढचे १५ महिने सरन्यायाधीशपदाचा कार्यभार न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्याकडे असेल. मावळते सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई काल सेवानिवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम ३७० रद्द करणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरची प्रकरणं, बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भातल्या प्रकरणाच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता.
Site Admin | November 24, 2025 10:07 AM | CJI SuryaKant
देशाचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत शपथ घेणार