डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सरन्यायाधीशपदावरुन निवृत्त झाल्यावर कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही-भूषण गवई

सरन्यायाधीशपदावरुन निवृत्त झाल्यावर आपण कायदेविषयक सल्ला- मार्गदर्शन आणि लवाद या पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेसाठी काम करणार असून कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितलं आहे. अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयात टी. आर. गिल्डा स्मृती ई-लायब्ररी’चं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. या ई वाचनालयामुळे वकीलांना कायदेशीर संदर्भ, निर्णय आणि लेख त्वरित उपलब्ध होतील. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि इतर न्यायाधीश तसंच इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

सरन्याायधीश गवई यांनी काल अमरावती जिल्ह्यात दर्यापूर या त्यांच्या मूळ गावी जाऊन दिवंगत रा.सु.गवई यांच्या स्मारकापाशी अभिवादन केलं. तसंच दर्यापूरच्या स्थानिक न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं.