June 19, 2025 7:45 PM

printer

नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या अध्यक्षतेखाली उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक

नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी आज उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी यावेळी विमानाची सुरक्षा, प्रवाशांसाठी सुविधा आणि विमान कंपन्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. नायडू यांनी देशभरातील विमानतळ संचालकांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला आणि प्रवाशांसाठीची मदत यंत्रणेचा आढावा घेतला.

 

विमान उड्डाणाला विलंब असेल तर विमानतळावर अन्न, पाणी आणि बसण्याची सुविधा देण्याचे निर्देश नायडू यांनी यावेळी दिले. प्रवाशांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी मनुष्यबळ उबलब्ध करून देण्यासही नायडू यांनी संचालकांना सांगितलं. नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी एअर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबतही बैठक घेतली. प्रवाशांची सोय आणि सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.