देशातल्या मनोरंजन आणि माध्यम जगात खूप क्षमता आहे. त्यांचा सुयोग्य वापर होण्याची गरज केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी आज व्यक्त केली. मुंबईत सीआयआय बिग पिक्चर समिटमध्ये ते बोलत होते. जागतिक बाजारपेठेत भारताची हिस्सेदारी केवळ २ टक्के आहे. यासंधीचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी उद्योगाला केलं. देशातल्या मनोरंजन उद्योगावर १ कोटीहून अधिक लोकं अवलंबून आहेत. AI आधारित गाणी आणि व्हिडीओ या क्षेत्रातली गणितं बदलत असताना आपणही नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
Site Admin | December 1, 2025 3:14 PM | CII Big Picture Summit
मुंबईत सीआयआय बिग पिक्चर समिटचं आयोजन…