आरोग्यसेवा परवडणारी करणे हे सरकारचे प्राधान्य- पियुष गोयल

वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की आरोग्यसेवा परवडणारी करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. नवी दिल्लीतील सीआयआय च्या 22 व्या वार्षिक आरोग्य शिखर परिषदेत ते बोलत होते.

त्यांनी आरोग्य आणि जीवनविम्यावरचा जीएसटी 18 टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणल्याने नागरिकांना दिलासा मिळाल्याचे सांगितले.