नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या

आगामी नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळात होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देशातल्या नऊ विभागात 138 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे. या गाड्यांच्या एकंदर 650 फेऱ्या होणार असून यातील 244 फेऱ्यांबाबतची सूचना जारी करण्यात आली आहे. नाताळ आणि नवीन वर्ष प्रवाशांना विनासायास साजरं करता यावं यासाठी या विशेष गाड्यांद्वारे अतिरिक्त क्षमता, सुविधा आणि सेवा पुरवण्याचा प्रयत्न असल्याचं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.