कुख्यात गुन्हेगार छोटा राजनला एका हत्या प्रकरणात मिळालेला जामीन आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप महेता यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.
मुंबईतला हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी याच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला खालच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली होती. ती स्थगित करुन मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला होता. मात्र ४ वेगवेगळ्या खटल्यांमधे दोषी ठरलेला छोटाराजन गेली २७ वर्ष फरार राहिल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन रद्द केला.