डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 9, 2025 8:46 PM | China | US

printer

अमेरिकेवरुन आयात होणाऱ्या वस्तूंवर ८४ % शुल्क लादण्याचा चीनचा निर्णय

अमेरिकेवरुन आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरीक्त ८४ टक्के शुल्क लादण्याचा निर्णय चीननं घेतला आहे. उद्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होईल, असं चीनच्या अर्थमंत्रालयानं जाहीर केलं आहे. 

 

अमेरिकेनं चीनी उत्पादनांवर १०४ टक्के आयात शुल्क लादल्यानंतर चीननं हा निर्णय घेतला आहे. अमेरिकन जागतिक व्यापार व्यवस्थेला गंभीर हानी पोहोचवली आहे, यामुळे जागतिक औद्योगिक पुरवठा साखळी, स्थैर्य आणि सुरक्षा धोक्यात आल्याचं चीननं प्रसिद्ध केलेल्या श्वेत पत्रिकेत म्हटलं आहे. 

 

हा मुद्दा सोडवण्यासाठी अमेरिकेसोबत चर्चेची तयारीही चीननं दाखवली आहे. दक्षिण कोरियाचे वाणिज्य मंत्री चेंओंग इन क्यो आयात शुल्क प्रकरणी वाटाघाटी करण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांच्या देशावर २५ टक्के आयात शुल्क लादलं आहे. 

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्कांमुळे जागतिक पातळीवर वृद्धी आणि वित्तीय स्थिरता धोक्यात आल्याचे बँक ऑफ इंग्लंडनं म्हटलं आहे.