डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

तैवानला चीनकडून धोका असल्याचा अमेरिकेचा इशारा

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी तैवानला चीनकडून लवकरच धोका निर्माण होणार असल्याचा इशारा दिला आहे. सिंगापूरमधील शांग्री-ला संवादात बोलताना हेगसेथ यांनी इशारा दिला की चीन आशियातील अनेक भागांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या आशेनं एक वर्चस्ववादी शक्ती बनण्याचा प्रयत्न करीत आहे.

 

अध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानवर आक्रमण करण्यासाठी चिनी सैन्याला 2027 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे असा दावा करून, अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी आशियाई देशांना संरक्षण खर्च वाढवण्याचं आणि युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेसोबत काम करण्याचं आवाहन केलं. चीन आशियातील शक्ती संतुलन बदलण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची तयारी करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.