चीनच्या विस्तारवादी आकांक्षांच्या विरोधात तैवानने आपल्या सार्वभौमत्वाच रक्षण करण्यासाठी संरक्षणसिद्धता वाढवण्याचा निश्चय केल्याचं तैवानच्या अध्यक्ष लाई चिंग ते यांनी म्हटलं आहे. चीनने आपल्या लष्करी सरावादरम्यान तैवानच्या दिशेने काही रॉकेट सोडल्याच्या घटनेनंतर त्यांनी हे विधान केलं आहे.
चीनच्या या कृतीमुळे तैवान आणि त्याच्या आसपासच्या भागात विनाकारण तणाव वाढत असल्याचं अमेरिकन सरकारने म्हटलं आहे. तैवान हा लोकशाही देश असून चीनने त्यावर लष्करी दबाव टाकू नये असं आवाहन अमेरिकेने केलं आहे.