तैवानच्या आसपास चीनने चालवलेल्या संयुक्त सेनासरावांचा तैवानने निषेध केला आहे. तैवानच्या संरक्षम मंत्रालयाने समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलंय की चिनी सैन्याच्या या कवायती आंतरराष्ट्रीय प्रथांचं उल्लंघन असून शेजारी देशांना सैन्यबळाच्या वापराने भिववण्याचा प्रकार आहे. चीनची लढाऊ विमानं आणि जहाजं तैवानबोवती दररोज घिरट्या घालत असून त्याचं प्रमाण अलिकडे वाढलं असल्याचं तैवानच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.
Site Admin | December 29, 2025 6:47 PM | China | Taiwan
चीनच्या संयुक्त सेनासरावांचा तैवानकडून निषेध