चीनला १-० ने नमवून आशियाई हॉकीचं अजिंक्यपद भारतीय महिला संघाला

बिहारच्या राजगीर इथे आज झालेल्या महिलांच्या आशियाई चषक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावलं. भारतीय संघाने चीनचा १ -० असा पराभव केला. सामन्याचं मध्यांतर होईपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. मध्यंतरानंतर भारताच्या दीपिकाने गोल करत खातं उघडलं आणि तोच भारतासाठी निर्णायक गोल ठरला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.