July 24, 2025 8:20 PM | China Open 2025

printer

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उन्नती हुडा उपांत्य फेरीत दाखल

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी प्रकाराच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताच्या उन्नती हुडा हिने ऑलिंपिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू हिचा २१-१६, १९-२१, २१-१३ असा पराभव केला. या विजयाबरोबर उन्नती ही चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली आहे. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरी प्रकारात सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज इंडोनेशियाच्या लिओ रॉली कार्नांडो आणि बगास मौलाना यांचा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉय याला चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन चेनकडून पराभव पत्करावा लागला. 

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.