शेन्झेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेत भारताची आघाडीची शटलर पीव्ही सिंधूनं आज थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा सरळ गेममध्ये पराभव करून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंधूचा या स्पर्धेतला हा सलग दुसरा विजय आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अन से यंग बरोबर होईल.
दरम्यान, भारताची सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी सध्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तैवानच्या चिउ हसियांग चिएह आणि वांग ची-लिन यांच्याशी लढत देत आहे.