November 22, 2024 8:08 PM | China Masters 2024

printer

सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत

सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या जोडीनं चायना मास्टर्स २०२४च्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. शेंझेन इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी डेन्मार्कच्या जोडीचा २१-१६, २१-१९ अशा थेट गेम्समध्ये पराभव केला. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना जपान आणि कोरिया यांच्यातल्या विजेत्या जोडीशी होणार आहे. दरम्यान, पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेन याला डेन्मार्कच्या अँडर्स अँडरसनकडून २१-१८, २१-१५ असा थेट गेम्समध्ये पराभव पत्करावा लागला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.