डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश / आज सामना कोरियाशी
चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. चीनमधे शेनझेन इथं, आज दुपारी होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांची लढत, कोरियन जोडीशी होणार आहे. किम वोन हो आणि सेओ सेऊंग जे ही कोरियन जोडी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असून विश्वविजेती देखील आहे.
उपान्त्य फेरीत त्यांनी मलेशियाची ऑलिंपिकविजेती जोडी आरोन चिया आणि सो वुई यिक यांचा २१-१७, २१-१४ असा पराभव केला.