चीनने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून प्रादेशिक सुरक्षा मजबूत करण्याच्या हेतूनं सर्व देशांनी दहशतवाद विरोधातली एकजूट बळकट करण्याचं आवाहन केलं आहे.
लष्कर ए तैय्यबा या दहशतवादी संघटनेचा गट रेझिस्टन्स फ्रंट पहलगाम हल्ल्यामागे होता, या गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर चीननं ही प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानमधले लष्कर ए तय्य्यबा, जैश-ए-मोहम्मद, जमात उद दावा हे दहशतवादी गट आणि हाफीज सईद, मसूद अझर या दहशतवादी कारवाया करणाऱ्या व्यक्तींचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं निर्बंध नियमांतर्गत समावेश केला आहे.