चीनच्या लष्करानं काल वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात आपल्या लढाऊ विमानांसह पहिल्यांदाच बॉम्बर फॉर्मेशन टेहळणी केली. फिलिपिन्सच्या नौदलानं अमेरिका आणि जपानसोबत संयुक्त टेहळणी केल्यानंतर फिलिपिन्सला इशारा देण्यासाठी चीननं ही टेहळणी केली.
दक्षिण चीन समुद्रावर आपला हक्क सांगणाऱ्या चीनचा फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान या देशांसोबत अनेक वर्षांपासून सागरी हद्दीबाबतचा वाद आहे. प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग असणाऱ्या या समुद्री क्षेत्रावर हे सर्व देशदेखील आपला हक्क सांगत आहेत.