डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 27, 2025 8:59 AM

printer

पावसामुळे प्रशासनाला सज्ज राहण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई आणि परिसरात पावसामुळे बाधित झालेल्यांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या पाऊस बाधित क्षेत्राची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. मुंबईत अनेक ठिकाणी वेळेआधी तसंच अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. काही ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा आता झाला असून वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी वार्ताहरांना दिली. 

 

मुंबईत सध्या नालेसफाई सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल. यापूर्वी मान्सूनपूर्व तयारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्यात आली होती. त्यांचे सर्व विभागांशी समन्वय साधला जात असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुंबईत काही ठिकाणी दरड कोसळण्यासंदर्भातही आपण सेफ्टी नेट बांधण्याचे आदेश आयुक्तांना दिल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. 

 

मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं. तसंच समुद्रकिनारी आणि सखल भागात जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनान केलं आहे, .

 

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा यंत्रणांनी सतर्क राहून उपाययोजना कराण्याच्या सूचना प्रशासनान केल्या आहेत.