विरोधकांनी राज्याला बदनाम करण्याचे धोरणआखल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे राज्यात विविध प्रकल्पांची सुरुवात आणि पायाभूत सुविधांचा विकास होत आहे. मात्र, राज्याला बदनाम करण्याचे धोरण विरोधकांनी आखल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

 

नागपूर विमानतळावर काल ते वार्ताहरांशी बोलत होते.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे ते जनतेची दिशाभूल करत असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.