डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्रात वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना केली असून याचं मुख्यालय पंढरपूर इथंच राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरात केली.ते काल पंढरपूरात आषाढी वारीच्या आढावा बैठकीत बोलत होते.यावेळी मंत्री मंडळातले इतर सहकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

 

पंढरपूर शहराचा सर्वंकष विकास आराखडा त्वरित सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व्हीआयपी लोकांपेक्षा वारकरी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांनाच प्राधान्य राहील,त्याचप्रमाणे प्रत्येक दिंडीसाठी घोषित केलेले २० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर वितरीत झाल्याचंही त्यांनी सांगितलं.पंढरपूर इथं येणाऱ्या वारकऱ्यांना यावर्षी पाणी आणि फळांच्या रसाचं मोफत वाटप करणार आहे.या ठिकाणी स्वच्छता राहावी,अशी व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

 

पंढरपूरात नेहमी हजारो नागरिक दर्शनासाठी येतात, त्यामुळे १ हजार बेडच्या नवीन रुग्णालयासाठी स्वतंत्र प्रस्ताव आरोग्य विभागानं तात्काळ सादर करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.