मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तराई जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांना भेट

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज तराई जिल्ह्यातल्या श्रावस्ती आणि बलरामपूरमधल्या पूरग्रस्त भागांना भेट देऊन पूरग्रस्तांची चौकशी केली. तर सहारनपूर जिल्ह्यामध्ये बचाव आणि मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण केलं आहे. गररा आणि खन्नौत नद्यांच्या प्रवाहात २६४ हून अधिकजणं अडकले असून १२ जिल्ह्यांतली ६३३ गावं पुराच्या तडाख्यात सापडली आहेत. तसंच हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली असून सुमारे ८ लाख लोक बाधित झाले आहेत.
 
 
मैलानी जंक्शन ते गोंडा यांना जोडणारा रेल्वे मार्ग पाण्याखाली गेला असून एल्गिन रोड पुलाला तडे गेले आहेत. आतापर्यंत बचावदलानं १० हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.
सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.