January 9, 2025 10:31 AM

printer

राज्यात ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना राबवणार – मुख्यमंत्री

महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातील नागरिकाला राज्यातल्या कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता यावी यासाठी ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना राबवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत महसूल विभागाच्या बैठकीत सांगितलं.

 

तसंच घरबसल्या दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात जमीन मोजणीसाठी जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित ई-मोजणी लागू करण्यात येणार आहे.

 

भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 30 कार्यालयांमध्ये भू प्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.