डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

लातूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणनवीस यांनी आज पाहणी केली. उदगीर तालुक्यात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला.

 

पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं असून योग्य ती मदत दिली जाईल असं यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यावेळी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.