डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातल्या १०९ शिक्षकांचा गौरव

विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशा दाखवण्यात शिक्षकांचं समर्पण, मार्गदर्शन आणि योगदान महत्त्वाचं असून त्यांच्यात जग बदलण्याची ताकद आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काढले. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार विजेत्या शिक्षकांना आज मुंबईत मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात १०९ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये प्राथमिक विभागातले ३८ शिक्षक, माध्यमिक विभागातले ३९ शिक्षक, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे १६ शिक्षक, कला आणि क्रीडा क्षेत्रातले २ विशेष शिक्षक, दिव्यांग किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतले एक आणि स्काऊट गाईड मधले दोन तसंच ८ शिक्षिकांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आले. राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारप्राप्त शिक्षकांपैकी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या ६ शिक्षकांचा पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या मुख्यालयात हा सत्कार सोहळा झाला. शिक्षक दिनानिमित्त आयआटी मुंबई इथं अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्र तसंच अध्यापन कौशल्य आणि संशोधनासाठी विविध प्राध्यापकांना पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.