डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोलमाफी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

येत्या गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोलमाफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठक झाली, तेव्हा ते बोलत होते. राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत तसंच कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी असे विविध निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले.

 

गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती, ती या वर्षीही कायम राहील त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात, त्यासाठी एक खिडकी योजना राबवावी. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.