डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धरणगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून ५० खाटांचं अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, इतर लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी तसंच मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी शासनाने ३९ कोटी ४६ लाख ७५ हजार रुपये मंजूर केले असून, अडीच एकर क्षेत्रात या उपजिल्हा रुग्णालयासह ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा