डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नवी मुंबई विमानतळाचं काम सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांनी या विमानतळाची पाहणी केली आणि आणि धावपट्टीपासून ते टर्मिनल इमारतीपर्यंतच्या प्रगतीची माहिती घेतली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. हा देशातला सगळ्यात अद्ययावत प्रकल्प ठरणार असून या विमानतळाचं ९४ टक्के काम पूर्ण झालं आहे. धावपट्टी आणि टर्मिनल इमारतीचं कामही पूर्ण झालं आहे. आता आतल्या भागाचं काम सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं

 

मुंबई-पुणे मिसिंग लिंकचीही पाहणी त्यांनी केली. या मार्गामुळे प्रवासासाठी लागणारा वेळ अर्ध्या तासाने, तर अंतर सहा किलोमीटरने कमी होईल, तसंच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा